‘आम्ही भारतात घुसून दारुल उलूम देवबंदमध्ये नाश्ता करू’ ; पाकिस्तानच्या नेत्याची धमकी

Pahalgam Attack । जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षणीयरीत्या वाढला आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानबाबत अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित करणे, पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवणे आणि पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे यासारख्या महत्त्वाच्या पावलांचा समावेश आहे. यानंतरही पाकिस्तान आपल्या कृतींपासून थांबत नाही. आता पाकिस्तान जमियत उलेमा-ए-इस्लामचे नेते मौलाना रशीद महमूद सूमरो यांनी भारताला धमकी दिली आहे.
रशीद महमूद सूमरोची भारताला धमकी Pahalgam Attack ।
पाकिस्तान जमियत उलेमा-ए-इस्लामचे नेते मौलाना रशीद महमूद सूमरो यांनी भारताला धमकी दिली आहे . त्यासाठी त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी,”मोदींनी हे समजून घ्यावे की पाकिस्तान एकटा नाही. गरज पडल्यास, आम्ही पाकिस्तानी सैन्यासोबत लढू आणि आमच्या पाकिस्तानचे रक्षण करण्यासाठी आमचे प्राणही देऊ. आम्ही फक्त आमच्या सीमांचे रक्षण करणार नाही तर भारतात प्रवेश घुसून दारुल उलूम देवबंद येथे चहा आणि नाश्ता देखील करू, असेही सूमरो म्हणाले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या निवेदनात हे सांगितले Pahalgam Attack ।
या आठवड्यात काश्मीरच्या पहलगाममध्ये २६ जणांच्या हत्येप्रकरणी कोणत्याही “निष्पक्ष आणि पारदर्शक” चौकशीसाठी पाकिस्तान तयार आहे, असे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी सांगितले. ते म्हणाले की, पाकिस्तानने सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला आहे आणि देश स्वतः त्याचा बळी राहिला आहे.
एका संकेतस्थळानुसार, काकुल येथील पाकिस्तान मिलिटरी अकादमीमध्ये पासिंग आउट परेडला संबोधित करताना शाहबाज शरीफ म्हणाले की, भारत कोणत्याही विश्वासार्ह तपासाशिवाय किंवा पडताळणीयोग्य पुराव्याशिवाय पाकिस्तानवर निराधार आणि खोटे आरोप करत आहे. पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले, “एक जबाबदार देश म्हणून आपली भूमिका कायम ठेवत, पाकिस्तान कोणत्याही निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे.” असे म्हटले आहे.





