पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील कोणाला मिळाला पुरस्कार? पाहा यादी

Padma Awards 2025 : केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कार प्राप्तकर्त्यांची नावे जाहीर करण्यात आली. पद्म पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे. यावर्षी सरकारने 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केले आहेत. यात महाराष्ट्रातील देखील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पद्म पुरस्कार मिळाला आहे.
पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला एकूण १४ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, प्रख्यात पार्श्वगायक पंकज उदास आणि कला क्षेत्रातील कामगिरीसाठी शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.
याशिवाय, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चैत्राम पवार यांसह महाराष्ट्रातील 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते
पद्मभूषण पुरस्कार विजेते
- मनोहर जोशी (मरणोत्तर)
- पंकज उधास (मरणोत्तर)
- शेखर कपूर
पद्मश्री पुरस्कार विजेते
- अच्युत पालव – कला
- अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग
- अशोक सराफ – कला
- अश्विनी भिडे देशपांडे – कला
- चैत्राम पवार – सामाजिक कार्य
- जसपिंदर नरुला – कला
- मारुती चितमपल्ली – साहित्य
- रानेंद्र भानू मुजुमदार – कला
- सुभाष खेतुलाल शर्मा – कृषी
- वासुदेव कामत – कला
- विलास डांगरे – वैद्यकीय





