पी. के. बिर्याणीच्या सर्व शाखांमध्ये “आखाड जोरात’

आषाढ मासानिमित्ताने कुटुंबीय, मित्रमंडळी, आप्तस्वकीयांसोबत हॉटेलममध्ये खवय्येगिरी करण्यासाठी “पी. के. बिर्याणी’च्या सर्व शाखांमध्ये आखाडाचा माहोल सुरू झाला आहे. व्हेज असो वा नॉनव्हेज, प्रत्येक पदार्थामधील वैविध्यता आणि झणझणीत, चमचमीत चवींचा नजराणा पी. के. बिर्याणीने आपल्या खवय्यांसाठी सादर केला आहे.
एकाच छताखाली लजिज बिर्याणीचे एकापेक्षा एक सरस प्रकार उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने मटका बिर्याणी, साजूक तुपातील मटण आणि चिकन बिर्याणी, चिकन तंदुरी बिर्याणीचा हॉटेल परिसरात दरवळणारा सुगंधच खवय्यांना येथे घेऊन येतो. येथे किलोप्रमाणे प्रत्येक बिर्याणीची घरपोच डिलिव्हरीही उपलब्ध आहे.
व्हेज खवय्यांसाठीही बटाटा, फरसबी आणि शेवगा घातलेली साजूक तुपातली आखनी बिर्याणीही स्वागतासाठी सज्ज असते. 20 डिसेंबर 2008 रोजी पी. के. बिर्याणीची स्थापना झाली. त्यानंतर आजमितीस 14 वर्षे अस्सल पुणेकरांसाठी बिर्याणींची खवय्येगिरी म्हणजे पी. की. बिर्याणीच असे समीकरणच झाले आहे. त्यामुळे आखाड मासानिमित्त या कालावधीत पी. के. बिर्याणीच्या बाणेर, डेक्कनसह सर्व शाखांमध्ये सवलत दिली जात आहे.
करोनाच्या सावटानंतर आता सगळे काही आलबेल झाले आहे. काही प्रमाणात नागरिकांमध्ये थोडीफार धाकधूक आहे; पण इथल्या स्टाफमधील प्रत्येकाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्याशिवाय हॉटेलमध्ये कोविड-19 संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. खवय्यांनी निश्चित यावे आणि आखाडाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन पी. के. बिर्याणीचे प्रकाश पाटील व कृष्णा पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, बाणेरच्या शाखेमध्ये आयोजित विविध महोत्सवाला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. याबद्दल शाखेचे व्यवस्थापक आकाश गरद आणि शुभम पाटील यांनी ग्राहकांचे आभार मानले असून त्यांना मॅनेजर राम आणि प्रकाश हे साथ देत आहेत.





