नगर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेत पी.ए. इनामदार ज्युनिअर कॉलेच्या विद्यार्थिनींनी यश संपादन केले असून, कॉलेजच्या विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
कॉलेजच्या गुणवत्ता यादीत प्रथम- सहेर शेख, द्वितीय- बुशरा मुजावर, तृतीय- सहेर सय्यद यांनी येण्याचा बहुमान पटकाविला. यावेळी मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रहीम खोकर, उपाध्यक्ष इकबाल सय्यद, सचिव विकार काझी, खजिनदार डॉ. खालिद शेख, प्राचार्य हारुन खान, उपप्राचार्य फरहाना शेख यानी कौतुक केले.