Ganeshotsav 2026 : सातव्या दिवशी १,३०० हून अधिक मूर्तींचे विसर्जन
विविध प्रथांनुसार, दीड दिवस, तिसरा दिवस, पाचवा दिवस, सहावा दिवस, सातवा दिवस आणि अनंत चतुर्दशी (उत्सवाचा समारोप दिवस) या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.

Ganeshotsav 2026 – गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी, रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत एकूण १,३३८ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आणि कोणतीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितले.
विसर्जन करण्यात आलेल्या मूर्तींपैकी १४ मूर्ती सार्वजनिक गणेश मंडळांच्या, १,२४८ घरगुती आणि ७६ मूर्ती गौरीच्या होत्या. विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडली, असे पालिकेने सांगितले.
विविध प्रथांनुसार, दीड दिवस, तिसरा दिवस, पाचवा दिवस, सहावा दिवस, सातवा दिवस आणि अनंत चतुर्दशी (उत्सवाचा समारोप दिवस) या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. भक्तांसाठी महानगरपालिकेने शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलावांसह, विसर्जनाची व्यवस्था केली आहे.





