संतापजनक.! ‘AI’च्या मदतीने बनवले तरुणींचे अश्‍लील व्हिडिओ; पोलीस अधिकाऱ्याची 2 मुले अटकेत

Updated On:
संतापजनक.! ‘AI’च्या मदतीने बनवले तरुणींचे अश्‍लील व्हिडिओ; पोलीस अधिकाऱ्याची 2 मुले अटकेत

मुंबई – आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (एआय) मदतीने 2 तरुणांनी तरुणींचा अश्‍लील व्हिडिओ तयार केल्याची संतापजनक घटना पालघरमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलीस अधिकाऱ्याची मुले आहेत. काही वर्षांपासून एआय तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढला आहे. त्यात या तंत्रज्ञानाचा गैरवापरही तेवढाच वाढला आहे.

कहर म्हणजे पालघरमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या 2 मुलांनी एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने 2 तरुणी व महिलांचे अश्‍लील व्हिडिओ तयार केले. ते एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी हे व्हिडिओ थेट सोशल मीडियावर शेअर केले. हा प्रकार समजल्यानंतर पीडित तरुणींनी आरोपींचा विरोध केला.

पण आरोपींनी शिरजोरी करत त्यांनाच मारहाण केली. त्यानंतर तरुणींनी थेट पोलिसांकडे धाव घेऊन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपींच्या मुसक्‍या आवळण्यात आल्या. आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने अश्‍लील व्हिडिओ तयार करण्याची ही पहिलीच घटना घडली आहे.

आरोपींचे वय 19 व 21 वर्षे आहे. त्यांचे वडील मुंबई पोलिसांत कार्यरत आहेत, असे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कल्याण करपे यांनी याविषयी बोलताना सांगितले.

आणखी संबंधित बातम्या

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी