आमच्या बारामतीचा सुपुत्र ठरला बिग बॉस मराठीचा विजेता; अजित पवारांनी केले सुरज चव्हाणच कौतुक

महाराष्ट्राला ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा विजेता मिळाला. महाराष्ट्राची मनं जिंकणारा सूरज चव्हाण ठरला ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाचा विजेता. तर अभिजीत सावंतने पटकावले दुसरे स्थान. सूरजला 14 लाख 60 हजार इतकी धनराशी मिळाली आणि मानाची ट्रॉफी.
चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या विजेता ‘सुरज चव्हाणला’ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवार म्हणाले “आमच्या बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सुरजनं हे यशोशिखर गाठलं आहे. सुरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. सुरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!’
आमच्या बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सुरजनं हे यशोशिखर गाठलं आहे. सुरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा… pic.twitter.com/HqX8atrEYV
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 6, 2024
महाविजेता सूरज चव्हाण म्हणाला….
‘बिग बॉस मराठी’च्या या गाजलेल्या पर्वाचा महाविजेता सूरज चव्हाण म्हणाला,”हे सगळं स्वप्नवत आहे माझ्यासाठी… माझं स्वप्न पूर्ण झालंआहे. बिग बॉस मराठी’साठी विचारणा होताच मी लगेचच होकार दिला होता. या घराने मला अनेक गोष्टी शिकवल्या. एक चांगला माणूस बनण्याचा मी प्रयत्न केला. प्रेक्षकांना मी भावलो. रसिक प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच ‘बिग बॉस मराठी’चा मी महाविजेता ठरलोय. सर्वच प्रेक्षकांचे मनापासून खूप-खूप आभार. या मंचाने मला खूप काही दिलंय. मी आयुष्यभर प्रेक्षकांचा ऋणी राहीन”.





