Sonali Kulkrani Post : मराठी सिनेसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या चुलत भावाचे निधन झाले असून, अभिनेत्रीने सोशल मीडियावरून अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. सोनाली कुलकर्णीचा चुलत भाऊ अनिरुद्ध याचे निधन झाले आहे. यामुळे संपूर्ण कुलकर्णी कुटुंब दुःखात आहे. सोनालीने सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत भावाच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली आहे. भावाच्या निधनाने अभिनेत्री पुरती खचली आहे. सोनाली कुलकर्णीची पोस्ट “आमचा अन्नूमा… हे जग सोडून तू एका चांगल्या ठिकाणी निघून गेलास. तुझ्या आत्म्याला शांती लाभो. तिकडे वेदनारहित नवीन आयुष्य मिळो. अध्यात्मिक, निरागस आणि जीव लावणारा असा मला माहीत असलेला सर्वात निर्मळ मनाचा व्यक्ती तू होतास. तुझं प्रत्येकासोबत छान नातं होतं. सगळ्यांवर निस्वार्थ प्रेम केलंस. सगळी गाणी तुला माहीत होती. तबला अगदी छान वाजवायचास…आणि तुझ्या हातचा चहा… तू जसा होतास तसाच राहिलास आणि सगळ्यांना प्रेम दिलंस. तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहू. ओम शांती”. असे पोस्टमध्ये सोनाली कुलकर्णी हिने म्हटले आहे. दरम्यान, मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीकडे पाहिले जाते. आत्तापर्यंत अभिनेत्रीने अनेक दर्जेदार चित्रपटात काम केले आहे. तिच्या सहज सुंदर अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. मराठीसोबत सोनालीने हिंदी चित्रपटातही आपल्या कामाचा ठसा उमटला आहे. हेही वाचा : Sushma Andhare post : भाजपची नवी कार्यकरणी जाहीर होताच सुषमा अंधारेंची खोचक पोस्ट; केशव उपाध्येंविषयी म्हणाल्या…