Sandeep Deshpande : “….तर आपल्याला पुढची पिढी षंढ म्हणेल”; संदीप देशपांडेंचं विधान, केली ‘ही’ मोठी घोषणा
Sandeep Deshpande : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे यांनी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध नोंदवत केंद्र सरकावर जोरदार टीका केली.

Sandeep Deshpande : काल संसद भवनाकडे हजारोंच्या संख्येने तरुणांनी धाव घेतली. नीट पेपरफुटी प्रकरणी पुकारलेल्या या आंदोलनाचे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये देखील पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले.
या शहरातील मुख्य ठिकाणी तरुणांनी एकत्र येत दिल्लीतील आंदोलनला पाठिंबा दिला. दिल्लीत संसद भवनाकडे कुच करणाऱ्या अनेक आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदविला. (Sandeep Deshpande)
पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध नोंदवत केंद्र सरकावर जोरदार टीका केली.
“आम्ही जालियन वाला बागमध्ये गोळ्या झाडणारा जनरल डायर नाही बघितला पण विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी चालवणारा “कायर “बघितला”. अशी उद्गिन प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावरुन पोस्ट करत दिली. पोलिसांनी पोलिसांप्रमाणे वागलं पाहिजे, गुंडांसारखं वागू नये. शेवटी त्यांनी एक लक्षात घ्यावे की, सरतेशेवटी ते जनतेला उत्तरदायी आहेत, सरकारला नाही. (Sandeep Deshpande)
पुढं देशपांडे म्हणाले, आधी विरोधात असताना नरेंद्र मोदी हे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सल्ला द्यायचे की, आंदोलकांवर लाठीमार करु नका. मोदींनी आता आपलं तेच भाषण ऐकले पाहिजे, असं संदीप देशपांडे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.
आम्ही जालियन वाला बाग मध्ये गोळ्या झाडणारा जनरल डायर नाही बघितला पण विद्यर्थ्यांवर अमानुष पणे लाठी चालवणारा “कायर “बघितला pic.twitter.com/hnnX2Bb5QX
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 21, 2026
पुढे ते म्हणाले, “काल दादरमध्येही आंदोलनावेळी पोलिसांनी मुलींचे केस ओढले. आम्ही आंदोलन करायचे नाही का? आता जर आपण हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीत तर आपल्याला पुढची पिढी षंढ म्हणेल, असे मोठं विधान संदीप देशपांडे यांनी केलं.
आंदोनलाचे कौतुक करत जनता तुमच्यासोबत असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असे मतही संदीप देशपांडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
जून महिन्यामध्ये चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्देवी घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या कारभावर जोरदार टीका करण्यात आली. या घटनेची दखल घेत एक चौकशी समिती घटित करण्यात आली होती. या चौकशी समितीने कंत्राटदाराला दंड ठोठावला. या मृत्यूंसाठी कोणीही जबाबदार नाही, असे अहवालात म्हटले आहे.
मनसे आझाद मैदानावर आंदोलन करणार (Sandeep Deshpande)
यानंतर आता मनसेने या निर्णयावरविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून आंदोलन छेडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. उद्या सकाळी ११ वाजता जबाबदारी निश्चित न करणाऱ्या व्यवस्थेविरोधात मनसे आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याची घोषणासं दीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
चेंबूर दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदाराला दंड लावला, बाकी कोणाला जबाबदार धरलं नाही. मोदींपेक्षा जास्त इगो हा अश्विनी भिडेंना आहे. आम्ही आयुक्तांना पत्र लिहिलं होतं, त्याचं उत्तर आयुक्तांकडून मिळालं नाही, असा आरोप देखील संदीप देशपांडे यांनी केला.






