Jayant Patil : आमच्या मनात काय आहे हे सहजासहज इतरांना कळत नाही : जयंत पाटलांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
Jayant Patil : आता सांगली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे.

Jayant Patil : गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र विमान प्रवास केला होता. त्याअगोदर जयंत पाटील यांनी महायुतीमधील अनेक नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. त्यामुळे मध्यतरीच्या काळात जयंत पाटील यांना अर्थमंत्री पद मिळणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. आता सांगली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे.
“मला पद मिळेल न मिळेल त्यात काय आता लगेच. पण गत सोडायची नसते, पण आपली मानस आपलीच. आपल्या बरोबर असतात यालाच राजकारणात महत्व द्यायचे असते. आणि निष्ठा महत्वाची आहे, असे विधान जयंत पाटलांनी केले आहे. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये ते बोलत होते. परिस्थिती नुसार बदलत गेले ना तर त्या माणसाची व्हॅल्यू कमी होत जाते. त्यामुळे निष्ठा असणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेत्यांच्या भेटीगाठीमुळे जयंत पाटील मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा रंगली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचाही दावा करण्यात आला. अजूनही केला जात आहे. त्याचवेळी जयंत पाटील यांनी जाहीर सभेत पुन्हा एकदा या विधानातून निष्ठेला महत्व असल्याचे स्पष्ट केले आहे. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक दिलीप तात्या पाटील यांचा वाढदिवसानिमित्त निष्ठा आणि जीवनावर आधारित फिडेल नावच पुस्तकाच अनावरण यावेळी करण्यात आले.
आमच्या मनात काय आहे हे सहजासहज इतरांना कळत नाही : जयंत पाटील
कृष्णा काठच्या लोकांची आपली परंपरा लढाईची आणि संघर्षाची आहे. संघर्ष करण्याचं या कृष्णा काठच्या लोकांना शिकवले आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील अनेक नवे आहेत. त्यामुळे या कृष्ण काठच्या माणस आम्ही फार वेगळी आहोत. आमच्या मनात काय आहे हे सहजासहज इतरांना कळत नाही, असेही जयंत पाटील यांनी म्हटल्याने त्यांच्या मनात नेमकं चाललयं तरी काय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.






