उस्मानाबादमध्ये 50 हजारांची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकासह शिक्षकास अटक
Updated On:

उस्मानाबाद – उस्मानाबादमध्ये मुख्याध्यापकासह शिक्षकाने 50 हजार रुपयाची लाच घेतल्या प्रकरणी अॅन्टी करप्शनने अटक केली आहे. वरिष्ठ वेतन व शाळेची इमारत बांधकामासाठी ही लाच मुख्याध्यापकाने घेतली होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडोळी येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात हा प्रकार घडला आहे.
राजेन्द्र धोंडीबा सूर्यवंशी, वय 45 असे मुख्याध्यापकाचे नाव असून अमोल नागनाथ गुंड, वय 45 असे लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याच शाळेतील शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




