Oscars 2022 : सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरल्यावर ‘विल स्मिथ’ला अश्रू अनावर; म्हणाला…..

न्यूयॉर्क – जागतिक स्तरावर चित्रपटसृष्टीतील सर्वात मानाचे पुरस्कार म्हणून ‘ऑस्कर पुरस्कार’ ला ओळखले जात. या मानाच्या पुरस्काराकडे जगातील अवघ्या मनोरंजन विश्वाची नजर लागून असते. दरम्यान यंदाचा 94 वा ऑस्कर सोहळा आज लिफोर्नियामधील लॉस एंजेलिस येथे पार पडला.
यावेळी किंग रिचर्ड या चित्रपटासाठी विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर ‘The Eyes of Tammy Faye’ या चित्रपटासाठी जेसिका चेस्टेन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जगभरातील करोना विषाणूच्या साथीमुळे दोन वर्षांनंतर या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
Best Actor in a Leading Role goes to Will Smith for his incredible performance in ‘King Richard’ Congratulations! #Oscars pic.twitter.com/y0UTX48214
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
दरम्यान, ऑस्करच्या या शर्यतीत भारतही असल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे कोट्यावधी भारतीयांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र त्यांच्या अपेक्षांचा भंग झाला आहे. रितू थॉमस आणि सुमित घोष या नवोदित दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या “रायटिंग विथ फायर’ या माहितीपटाला नामांकन मिळालं होते. या माहितीपटामध्ये “खबर लहारिया’ या दलित महिलेकडून चालवल्या जाणाऱ्या भारतातील एकमेव दैनिकाची माहिती देण्यात आली आहे.





