Oscar 2023 : ऑस्कर आधीच RRR चित्रपटाला मोठा धक्का; ‘नाटू-नाटू’ गाण्यावर….

नवी दिल्ली – यंदाच्या 95व्या ऑस्कर सोहळ्याला आता काही दिवस राहिले आहेत. 12 मार्च 2023 ला ऑस्कर सोहळा होणार आहे. हा मनोरंजन विश्वातील सर्वात प्रतिष्ठेचा सोहळा म्हणून ओळखला जातो. भारतासाठी यंदाचा हा सोहळा खूप खास आहे. याच कारण म्हणजे ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला नॉमिनेशन मिळालं आहे. आता पर्यंत ‘नाटू नाटू’ गाणं अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात गाजलं. या गाण्यात अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांची जबदस्त केमेस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
दरम्यान, यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात अभिनेता ‘राम चरण’ ‘नाटू नाटू’ गाण्यावर नाचताना दिसणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. पण, राम चरण किंवा ज्युनियर एनटीआर नाही तर ‘लॉरेन गॉटलीब’ आता ‘नाटू नाटू’ गाण्यावर नाचताना भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. लॉरेन गॉटलीबने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. जिथे तिने याबद्दलची सविस्तर माहिती चाहत्यांशी शेअर केली आहे.
View this post on Instagram
टीव्ही डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला झा’मध्ये आपले नृत्यकौशल्य दाखवणारी अमेरिकन डान्सर लॉरेन गॉटलीब पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान, लॉरेन आपल्या इंस्टाग्राम पोस्ट म्हणते की, “मी ऑस्करमध्ये ‘नाटू नाटू’ वर परफॉर्म करणार आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. शुभेच्छा..!’ या आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.





