हॉटेलमध्ये ‘ते’ कृत्य करणं ‘ओरी’ला पडलं चांगलाच महागात; ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांनी थेट सांगितलं….

Jammu & Kashmir | Orhan Awatramani | Orry : बॉलिवूड सेलिब्रिटींचा जवळचा मित्र ‘ओरी’ उर्फ ओरहान अवतरमणीसह ८ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कटरा येथील एका हॉटेलमध्ये दारू पिल्याबद्दल ओरी आणि इतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले आहे.
‘या’ ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, कटरा पोलिस ठाण्यात ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे. ज्या आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे ते म्हणजे ओरी, दर्शन सिंग, पार्थ रैना, हृतिक सिंग, राशी दत्ता, रक्षिता भोगल, शगुन कोहली आणि अर्जमस्किना.
Jammu & Kashmir | As per police, FIR was registered against eight people, including socialite influencer Orhan Awatramani aka Orry, for allegedly consuming alcohol in a hotel located in Katra
— ANI (@ANI) March 17, 2025
अनास्तासिला अरझामास्किना ही रशियन नागरिक आहे. ते ओरी आणि त्याच्या मित्रांसह कटरा येथे गेला. अशा परिस्थितीत, जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या (डीएम) आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आणि धार्मिक भावना दुखावल्याबद्दल या आठ जणांविरुद्ध एफआयआर (क्रमांक ७२/२५) दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (BNSS) च्या कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, “या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसपी कटरा, डेप्युटी एसपी कटरा आणि एसएचओ कटरा यांच्या देखरेखीखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
ओरीसह सर्व आरोपींना नोटीस पाठवून तपासात सामील होण्याचे निर्देश दिले जातील. एसएसपी रियासी यांनी सांगितले आहे की कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर, विशेषतः धार्मिक स्थळांवर दारू किंवा ड्रग्ज सेवन करणे अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल.” असं पोलिसांनी सांगितलं आहे.
कोण आहे? ओरहान अवतारमणी उर्फ ‘ओरी’
24 वर्षीय ‘ओरी’चे खरं नाव “ओरहान अवत्रामणी’ असून, ‘मुंबईकर’ ओरीने न्यूयॉर्कमधून शिक्षण घेतले आहे. फाइन आर्ट्स आणि कम्युनिकेशन डिझायनिंगमध्ये त्यानी पदवी प्राप्त केली आहे.
मुंबईतील व्यापारी कुटुंबातील ओरी त्याचे वडील जॉर्ज अवत्रामणी, आई शहनाज आणि दोन भावांसह राहतात. त्याचा भाऊ जनसंपर्क कंपनी सांभाळतो करतो तर, दुसरीकडे ओरी स्वतः ट्रेन अॅनिमेटर आहे.
तो स्टार किड्सच्या खास मित्रांपैकी आहेत. ओरहान मोठ्या स्टार्ससोबत पार्ट्यांमध्ये दिसतो. ओरहानचे टोपण नाव ‘ओरी’ आहे. सगळे त्याला प्रेमाने ओरी म्हणतात. ओरहानला पार्ट्यांचा शौक आहे आणि तो स्टार्ससोबत मोठ्या पार्ट्यांमध्ये दिसतो.
ओरहान अनेकदा त्याच्या इन्स्टा हँडलवर स्टार किड्ससोबतचे फोटो शेअर करत असतो. सारा अली खानसोबतही तो अनेकदा दिसला आहे. याआधी ओरी सारा अली खानला डेट करत असल्याची बातमी आली होती, पण नंतर ओरीचे नाव जान्हवी कपूर आणि आता न्यासा देवगणसोबत जोडले जाऊ लागले.
ओरीचे अंबानी कनेक्शन जाणून घ्या…
ओरी स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजतो. सध्या ओरी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) मध्ये स्पेशल प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून एका प्रोजेक्टवर काम करत आहेत. रिलायन्स रिटेल अंतर्गत, ओरी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि भारतीय फॅशन उद्योग (नुकतेच मेगा शॉपिंग सेंटर ‘जिओ प्लाझा’ लाँच केले) या योजनेवर काम करत होता.





