ओरीने 9 ते 5 जॉब करणाऱ्यांची उडवली खिल्ली; नेटकऱ्यांनीही चांगलेच सुनावले

Orry New Hairstyle | मागील काही दिवसांपासून बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये ओरहान अवत्रामणी अर्थात ओरी हे नाव चर्चेत आहे. अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये मोठ्या स्टार्स आणि स्टार मुलांसोबत तो पाहायला मिळतो. सोशल मीडियावर देखील तो सक्रिय असल्याचे दिसते. नुकतेच त्याने केलेल्या नव्या लुकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत ओरीनं थेट 9 ते 5 नोकरी करणाऱ्यांची खिल्ली उडवली आहे. यावरून सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे.
ओरीने त्याच्या नवीन हेअरस्टाइलचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फोटोंसोबत त्याने जे कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी रोज संध्याकाळी चेहऱ्यावर हास्य घेऊन उठतो. यात मला काहीच वावगं वाटत नाही. तुम्ही कदाचित अजूनही ९ ते ५ या वेळेत काम करत आहात. मला तर वाटते यावेळेत काम करणं किती वाईट आहे.” यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच सुनावले आहे.
View this post on Instagram
ओरीला या नव्या लूकसाठी देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एकाने विचारले, ‘काय गरज होती?’ तर दुसऱ्याने कमेंट करत ’केएफसीचे नवीन लोगो’ असे म्हंटले आहे. तर ‘तुझ्या जन्मावेळी मदत करणाऱ्या परिचारिकाही या वेळेतच काम करतात,’ असेही एका नेटकऱ्याने ओरीला सुनावले आहे. वास्तविक, आपल्या अनोख्या स्टाईलने आणि फोन कव्हरने ओरी लक्ष वेधून घेत असतो. सध्या त्याचे नवीन लूकचे फोटो काही नेटिझन्सना पसंत पडले नाहीत यावरुन त्याच्यावर टीका केली जात आहे.
हेही वाचा:





