satara | सातार्यात रविवारी जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन
Updated On:

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे कै. अॅड. ललिता मुतालिक यांच्या स्मरणार्थ रविवार दि. 30 रोजी जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
या स्पर्धा व्यायाम मंडळ (क्रांतीस्मृती) येथे होणार आहेत. या स्पर्धा पुरुष एकेरी गटातील 40 वर्षावरील व 40 वर्षाखालील गटात होणार आहेत. या स्पर्धा रविवार दि. 30 रोजी सकाळी 9.30 वाजता होणार असून बक्षीस समारंभ रात्री ८ वाजता होणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव सुदीप भस्मे यांनी दिली.
अधिक माहितीसाठी विपुल साळवलकर 9422401067, मनिष महाडवाले 9890398191, सुदीप भस्मे 9890957500 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





