पिंपरी | गणेश जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

देहूगाव, (वार्ताहर) – गणेश जयंती निमित्त देहूरोड आणि देहूगाव परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरण भक्तीमय बनले होते.
या वेळी श्रींना अभिषेक व गणेश यज्ञ, होम, पूजा करण्यात आली. अनेक ठिकाणी पाळणा बांधून श्री गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. देहूरोड भाजी मंडई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच विकासनगरमधील गणेश मंदिर तर देहूगावमधील मुख्य गणेश मंदिर, नवश्या गणपती आणि काळा मारुती गणेश मंडळ येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दिवसभर अनेक ठिकाणी भजनी मंडळाचे भजन झाले. परिसरातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. विकासनगरमधील श्री शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने नेत्र व आरोग्य तपासणी तसेच, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आली होती. श्रींची महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करून गणेश जयंती सोहळ्याची सांगता करण्यात आली.





