विशिष्ट ट्विटर अकाऊंट्स ब्लॉक करण्याचे आदेश; कारवाईची नोटीस देखील दिली

नवी दिल्ली – भारत सरकारने अलीकडेच एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील काही अकाऊंट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. ट्विटरने असहमती दर्शवत सरकारचा हा आदेश मान्य केला आहे.
भारत सरकारच्या आदेशानंतर काही ट्विटर अकाऊंट ब्लॉक किंवा निलंबित करत आहेत. परंतु आम्ही याच्याशी सहमत नाही. लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, असे एक्सच्या ग्लोबल गव्हर्नमेंट अफेयर्स टीमने एका पोस्टद्वारे म्हटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती आणि सूचना प्रसारन मंत्रालयाने गृह खात्याच्या विनंतीनंतर शेतकरी आंदोलनाशी निगडित १७७ सोशल मीडिया अकाऊंट आणि लिंक ब्लॉक करण्याचे आदेश दिले.
भारत सरकारने विशिष्ट अकाऊंट्स आणि पोस्टवर कारवाई करण्याचे कार्यकारी आदेश जारी केले आहेत. या अकाऊंट्सवर दंड आणि तुरुंगवास अशी कारवाई अधीन आहे.
या आदेशांचे पालन करून हे अकाऊंट्स आणि पोस्ट केवळ भारतातच रोखल्या जातील; तथापि, आम्ही या कृतींशी असहमत आहोत आणि या पोस्टबाबत भाषण स्वातंत्र्याचा निकष लागला पाहिजे, असे आम्ही मानतो.
आम्ही आमच्या धोरणांनुसार संबंधित युझर्सना या कारवाईची नोटीस देखील दिली आहे. कायदेशीर निर्बंधांमुळे, आम्ही कार्यकारी आदेश प्रकाशित करण्यास असर्थ आहोत,
परंतु पारदर्शकतेच्या दृष्टीने ते सार्वजनिक करणे आवश्यक आहे, असे आम्हाला वाटते, असे एक्सच्या ग्लोबल गव्हर्नमेंट अफेयर्स टीमने म्हटले आहे.





