INDIA bloc : मतचोरीच्या आरोपांवरून विरोधक एकवटले; राहुल गांधी म्हणाले, ‘संघर्ष थांबणार नाही!’
INDIA bloc : मतचोरीच्या आरोपांवरून इंडिया आघाडीचे नेते एकत्र आले. राहुल गांधी यांनी लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

INDIA bloc : मतचोरी आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली. लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव एम. ए. बेबी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव डी. राजा, समाजवादी पक्षाचे खासदार हरेंद्र मलिक आणि आनंद भदौरिया, तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष, झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदार महुआ माझी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, विद्यार्थी नेत्या नेहा बोरा, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यासह विरोधी पक्षांचे अन्य नेते उपस्थित होते.
ज्ञानेश कुमार एक ऐसा माफिया है, जिसने पूरे सिस्टम का अपराधीकरण कर दिया है।
पिछले 12 साल से मोदी और शाह ने देश को डराकर और धमकाकर रखा था, लेकिन अब डरने की बारी उनकी है।
राहुल गांधी जी के नेतृत्व में लोकतंत्र और वोट के अधिकार की यह लड़ाई जारी रहेगी। हम सब मिलकर संविधान की रक्षा के लिए अपनी आवाज उठाते रहेंगे।
: शिवसेना (UBT) सांसद @rautsanjay61 जी
📍 दिल्ली
— Congress (@INCIndia) October 13, 2026
राहुल गांधी म्हणाले, “लोकशाही प्रक्रिया पुन्हा मजबूत करण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. संविधान आणि निवडणूक व्यवस्थेला नुकसान पोहोचवणाऱ्यांना न्यायाला सामोरे जावे लागेल.” पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही त्यांनी टीका केली. जंतरमंतरवरील आंदोलनाला परवानगी नाकारण्याच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधकांचा एकत्रित लढा –
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गेल्या काही दिवसांतील आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला. नागरिक आणि तरुण मतचोरीच्या आरोपांविरोधात आवाज उठवत असल्याचे ते म्हणाले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. समाजवादी पक्षाचे खासदार हरेंद्र मलिक यांनीही न्यायासाठी इंडिया आघाडी एकत्र असल्याचे सांगितले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव एम. ए. बेबी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संविधानाने दिलेले अधिकार जपण्यासाठी दिल्लीपासून गावपातळीपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवरही राहुल गांधी यांनी भाष्य केले. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेसोबत राजकीय आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.





