राजगुरुनगर : १२ गावातून जाणाऱ्या रिंग रोडला विरोध; पाण्याच्या टाकीवर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न

Updated On:
राजगुरुनगर : १२ गावातून जाणाऱ्या रिंग रोडला विरोध; पाण्याच्या टाकीवर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न

राजगुरुनगर –  खेड तालुक्यात १२ गावातून जाणाऱ्या रिंग रोडला विरोध करण्यासाठी आणि आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही. आंदोलन कर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने आज (दि.६) सकाळी ६वाजता रिंग रोड व पुणे नाशिक रेल्वे विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी राजगुरूनगर येथील प्रांत कार्यालयासमोरील पाण्याच्या उंच टाकीवर जाऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/2135774783230193

तालुक्यातील खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, केळगाव, आळंदी, च-होली, धानोरे, सोळू, मरकळ आणि गोलेगाव या बारा गावांनी तीव्र विरोध केला असून खेड प्रांत कार्यालयासमोर गेली नऊ दिवसांपासून “ज्ञानेश्वरी वाचन चक्री उपोषण” सुरू आहे मात्र प्रशासनाने याबाबत दखल घेतली नाही.त्यामुळे समितीने आंदोलन तीव्र केले. आज दि ६ रोजी रिंग रोड व पुणे नाशिक रेल्वे विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी प्रांत कार्यालयासमोरील उंच पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांनी पाटील गवारी यांना खाली येण्यासाठी सांगितले.त्यांच्या कार्यकर्त्यांनीही खाली येण्यासाठी सांगूनही त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. जो पर्यंत सरकार यात लक्ष घालत नाहीत रिंग रोड रद्द करत नाही. तसे लेखी देत नाहीत तोपर्यंत खाली येणार नाही अशी भूमिका घेतली.

आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा कालच खेड तालुका रिंग रोड व पुणे नाशिक रेल्वे विरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यानी इशारा दिला होता.आज लगेचच त्याचे अनुकरण झाले.
दरम्यान सकाळी सहा वाजताच गवारी प्रांत कार्यालयासमोरील टाकीवर चढून घोषणा देऊ लागल्याने प्रशासन खडबडून जागे झाले तर ही घटना पाहण्यासाठी बघ्याची मोठी गर्दी झाली.

आणखी संबंधित बातम्या

Pune District : राजगुरुनगरच्या वाहतुकीचा बोजवारा

2026-10-09 07:52:57

Pune District : राजगुरुनगरच्या वाहतुकीचा बोजवारा

Rajgurunagar : अधिकार्‍यावरील हल्ल्यानंतर कर्मचारी संतप्त

2026-10-07 08:15:54

Rajgurunagar : अधिकार्‍यावरील हल्ल्यानंतर कर्मचारी संतप्त

Pune District : दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत द्या

2026-10-07 07:45:26

Pune District : दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत द्या

Pune District : राजगुरुनगरात साडेसहा तास जल्लोष

2026-09-27 07:39:14

Pune District : राजगुरुनगरात साडेसहा तास जल्लोष

Pune District : संधी मिळाल्यास पीडीसीसी निवडणूक लढणार - किरण आहेर

2026-09-27 07:33:52

Pune District : संधी मिळाल्यास पीडीसीसी निवडणूक लढणार - किरण आहेर