विरोधीपक्ष नेते फडणवीस यांची भिगवणला धावती भेट

भिगवण – माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपल्या नियोजित दौऱ्या करिता पुण्याहून सांगोला (जि. सोलापूर)कडे जात असताना त्यांचे स्नेही अजित क्षीरसागर यांच्या आग्रहावरून भिगवण येथे सदिच्छा भेटीसाठी थांबले होते.
यावेळी अजित क्षीरसागर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थितांची विचारपूस केल्यानंतर पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले. देवेंद्र फडणवीस यांचा दौरा अजित क्षीरसागर यांना समजल्यानंतर त्यांनी दौंडचे आमदार राहुल कुल
यांना कल्पना देत भिगवण येथे थांबण्याची विनंती केली. आमदार कूल यांनीही भिगवण येथे सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान थांबत असल्याचा निरोप पाठविला. यावेळी भिगवणकरांनी त्यांचे स्वागत केले त्यांच्यासोबत
माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे होते. याप्रसंगी अजित क्षीरसागर, भाजपचे ज्येष्ठ नेते मारुतराव वणवे, तुषार क्षीरसागर, दत्ता धवडे, प्रसाद क्षीरसागर, अविनाश
गायकवाड, जित नेमाडे, जीलानी शेख, नारायण मोरे आणि क्षीरसागर कुटुंबातील महिला उपस्थित होत्या.





