Rajya Sabha: राज्यसभेच्या अध्यक्षांना हटवण्याचा प्रस्ताव आणणार विरोधक, सपा-आप-टीएमसीचाही पाठिंबा
Updated On:

Rajya Sabha: राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्याविरोधात विरोधी आघाडी अविश्वास प्रस्ताव आणू शकते. या प्रस्तावावर 50 हून अधिक खासदारांनी स्वाक्षरी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ज्या पद्धतीने कामकाज हाताळले आणि विरोधी पक्षनेत्यांची झालेली बाचाबाची पाहता विरोधकांकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस (TMC), आम आदमी पार्टी (AAP), समाजवादी पार्टी (SP) आणि विरोधी आघाडीचे सदस्य या अविश्वास प्रस्तावसाठी एकत्र आले आहेत.
वारंवार भाषणात व्यत्यय आणणे, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेला परवानगी नाकारणे आणि चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्षाची बाजू घेतल्याचा आरोप विरोधी आघाडीच्या नेत्यांनी धनखड यांच्यावर केला आहे.





