#upsc exam | यूपीएससी उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलून घेण्याची संधी
Updated On:

पुणे -केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) पूर्व परीक्षा 10 ऑक्टोबर रोजी होत आहे. यासाठी उमेदवारांना आपले परीक्षा केंद्र बदलण्याची संधी देण्यात आली आहे. त्यासाठी 12 जुलैपासून उमेदवार परीक्षा केंद्रामध्ये बदल करू शकतील, असे “यूपीएससी’ने स्पष्ट केले आहे.
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी केंद्र बदलण्यासाठी शेवटची तारीख ही 19 जुलैपर्यंत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांची मोठी संख्या लक्षात घेता आयोगाने परीक्षा केंद्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासोबतच यूपीएससी पूर्व परीक्षेसह अन्य परीक्षेच्या उमेदवारांना आपले केंद्र आपल्या इच्छेनुसार बदलण्याचा निर्णय घेता येणार आहे. परीक्षा केंद्रामध्ये बदल हे प्रथम अर्जास प्राधान्य तत्त्वावर करण्यात येणार आहे





