Opinion Poll 2026: बंगाल ते केरळ… कुठे कोणाचे सरकार? सर्वेक्षणातील धक्कादायक अंदाज
Opinion Poll 2026:

Opinion Poll 2026: देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू आणि केरळ या चार राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या ओपिनियन पोलमध्ये अनेक ठिकाणी चुरशीची लढत दिसत असून काही निकाल आश्चर्यचकित करणारे आहेत.
आसाम आणि केरळमध्ये ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर तमिळनाडूत २३ एप्रिल आणि पश्चिम बंगालमध्ये २३ एप्रिल आणि २९ एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.
पश्चिम बंगाल : काट्याची टक्कर
२९४ जागांच्या पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्यात जोरदार सामना दिसत आहे. Matrize सर्वेनुसार TMC ला ४३ टक्के मतांसह १४० ते १६० जागा मिळू शकतात. BJP ला ४१ टक्के मतांसह १३० ते १५० जागांचा अंदाज आहे. इतर पक्षांना ८ ते १६ जागा मिळण्याची शक्यता आहे. बहुमतासाठी १४८ जागांची गरज असून TMC ला केवळ २ टक्क्यांची आघाडी आहे, त्यामुळे निकाल अनिश्चित मानला जात आहे.
आसाम : BJP आघाडीवर
१२६ जागांच्या आसाममध्ये BJP-नेतृत्वाखालील NDA मजबूत स्थितीत आहे. Matrize सर्वेनुसार NDA ला ४६% मते आणि ९२ ते १०२ जागा मिळू शकतात. काँग्रेस आघाडीला ३६% मते आणि २२ ते ३२ जागा, तर इतरांना ४ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. Chanakya सर्वेनुसार NDA ला ८३ ते ९०, काँग्रेस आघाडीला ३० ते ३६ आणि इतरांना ३ ते ६ जागा मिळू शकतात.
तमिळनाडू : NDA ला संधी
२३४ जागांच्या तमिळनाडूमध्ये DMK आणि AIADMK-भाजप आघाडीत थेट लढत आहे. Matrize ओपिनियन पोलनुसार DMK ला १०२ ते ११५ जागा मिळू शकतात, तर NDA ला १०७ ते १२० जागांचा अंदाज आहे. अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाला ५ ते १२ जागा मिळण्याची शक्यता असून इतरांना १ ते ६ जागा मिळू शकतात.
केरळ : तिहेरी लढत
१४० जागांच्या केरळमध्ये LDF, UDF आणि BJP यांच्यात तिरंगी सामना आहे. सर्वेनुसार LDF ला ६२ ते ६८ जागा मिळू शकतात, तर काँग्रेस-नेतृत्वाखालील UDF ला ६७ ते ७३ जागांसह आघाडी मिळू शकते. BJP ला सुमारे १५% मतांसह ५ ते ८ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर इतरांना ० ते ३ जागा मिळू शकतात.
दरम्यान, चारही राज्यांमध्ये निकाल चुरशीचे दिसत असून अनेक ठिकाणी सत्तांतराची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अंतिम निकालासाठी सर्वांचे लक्ष मतदान आणि मतमोजणीवर लागले आहे.




