Bengal Opinion Poll 2026: ममता बॅनर्जी की भाजप, पश्चिम बंगालमध्ये यावेळी कोण स्थापन करणार सरकार?
Bengal Opinion Poll 2026: 2021 मध्ये 8 टप्प्यांत निवडणूक झाली होती. त्यावेळी TMC ने 294 पैकी 215 जागा जिंकून सुमारे 48 टक्के मतांसह स्पष्ट बहुमत मिळवले होते.

Bengal Opinion Poll 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 संदर्भात MATRIZE या संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये अत्यंत चुरशीचा मुकाबला दिसत आहे. सर्वेक्षणानुसार ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) ला 43 टक्के मते मिळण्याची शक्यता असून भाजपला 42 टक्के मते मिळू शकतात. इतर पक्षांना 16 टक्के मतांचा अंदाज आहे.
294 जागांपैकी TMC ला 140 ते 160, तर भाजपला 130 ते 150 जागा मिळण्याचा अंदाज आहे. बहुमतासाठी 148 जागांची गरज असल्याने सत्तेसाठी कडवी लढत अपेक्षित आहे.
दरम्यान, हुमायूं कबीर यांनी TMC सोडून ‘आम जनता उन्नयन पार्टी’ स्थापन केली असून त्यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM सोबत आघाडी केली आहे. मुस्लिम मतदार असलेल्या मतदारसंघांत या आघाडीचा TMC ला फटका बसण्याची शक्यता असून त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होऊ शकतो.
निवडणूक वेळापत्रक –
पहिल्या टप्प्याची अधिसूचना 30 मार्च, दुसऱ्या टप्प्याची 2 एप्रिल रोजी जाहीर होईल. नामांकनाची अंतिम तारीख अनुक्रमे 6 व 9 एप्रिल असून छाननी 7 व 10 एप्रिलला होईल. अर्ज माघारीची अंतिम तारीख 9 व 13 एप्रिल आहे. 23 आणि 29 एप्रिलला मतदान होईल आणि 4 मे 2026 रोजी अंतिम निकाल जाहीर होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मे 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे.
मतदारसंख्या –
राज्यात एकूण 6.44 कोटी मतदार आहेत. त्यात 3.28 कोटी पुरुष, 3.16 कोटी महिला आणि 1152 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. 18-19 वयोगटातील 5.23 लाख नवीन मतदार, 20-29 वयोगटातील 1.31 कोटी मतदार, 85 वर्षांवरील 3.79 लाख आणि 4.16 लाख दिव्यांग मतदार या निवडणुकीत सहभागी होणार आहेत.
2021 चा निकाल –
2021 मध्ये 8 टप्प्यांत निवडणूक झाली होती. त्यावेळी TMC ने 294 पैकी 215 जागा जिंकून सुमारे 48 टक्के मतांसह स्पष्ट बहुमत मिळवले होते.





