ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कम्प्युटर गेम: नाना पटोलेंचे वादग्रस्त विधान; बावनकुळेंनी घेतला समाचार म्हणाले…

Nana Patole : भारताने पाकिस्तानला अॅापरेशन सिंदूरची आधाची माहिती दिल्याने पाकिस्तानने आपली माणसं त्या ठिकाणाहून हटवली, असा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. तसेच अॅापरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कॉम्प्युटर गेम झाला होता, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आले, असेही पटोले म्हणाले आहेत.
पहलगाम हल्ल्याला भारताने सिंदूर मोहिमेच्या अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या मोहिमाविषयी नाना पटोले यांनी सरकारला मोठा सवाल उपस्थित केला आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी लपले तरी कुठे? ते अजून फरार कसे, ते अजून का सापडले नाहीत, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. मोदी सरकार या प्रकरणात वारंवार खोटे बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्याने हे स्पष्ट झाले होते की, आपण पाकिस्तानमधील कोणत्या ठिकाणांना लक्ष्य करणार आहोत. त्यांनी मग त्या ठिकाणाहून त्यांची माणसं हटवली. याचा अर्थ असा की, जो खेळ लहान मुलं कम्युटर, संगणकावर खेळतात, तसाच हा प्रकार होता. भारताने पाकिस्तानला अगोदरच सांगण्यात आले होते की त्यांच्या कोणत्या ठिकाणी हल्ले होणार आहेत.
तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला….
नाना पेटोले यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना, तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही, असे म्हणत बावनकुळे यांनी पेटोले यांच्या विधानाचा निषेध केला. तुमचा मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे, असे देखील ते म्हणाले.
कांग्रेस नेता @NANA_PATOLE ने ‘ऑपरेशन सिंदूर एक कंप्यूटर गेम है’ ऐसा आपत्तिजनक बयान देकर यह फिर साबित कर दिया है कि “कांग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ”।
भारत के दुश्मनों के दिल में डर पैदा करने वाले इस ऑपरेशन का अपमान करना सिर्फ हमारे वीर जवानों और उनके शौर्य का नहीं, बल्कि पूरे…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 12, 2025
बावनकुळे यांनी त्यांच्या एक्सवरून हे भाष्य केले आहे. भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणे म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाहीतर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे, असे देखील बावनकुळे म्हणाले आहेत.





