Operation Sindoor : अजित डोवाल पुन्हा ॲक्शनमोडमध्ये ! काय आहे भारताचा पुढचा प्लॅन? पाहा….

Operation Sindoor : भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दल आणि लष्कराने मिळून पाकिस्तानातील लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या 9 दहशतवादी तळांवर मिसाईल हल्ले करून त्यांचा पूर्णपणे नायनाट केला.
या कारवाईने पाकिस्तानात खळबळ उडाली असून, तिथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. भारताच्या या धडाडीच्या कारवाईनंतर आता पाकिस्तान घाबरला असून, सरेंडर करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, या यशस्वी ऑपरेशननंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अनेक देशांतील समपदस्थ अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे.
डोवाल यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार तथा परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, युकेचे सल्लागार जोनाथन पॉवेल, सौदी अरेबियाचे सल्लागार मुसैद अल ऐबन, संयुक्त अरब अमिरातीचे सल्लागार शेख तहनून आणि महासचिव अली अल शम्सी आणि जपानचे सल्लागार मसाटाका ओकानो यांच्याशी संवाद साधला आहे. यासोबतच त्यांनी रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सर्गेई शोइगू यांनीही भारताच्या या क्षेपणास्त्र हल्ल्याबद्दल कल्पना दिली आहे.
या हल्ल्याबाबत डोवाल यांनी चीनलाही अवगत केले आहे. त्यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री आणि फ्रांसचे राष्ट्रपती इमैनुएल बोने यांच्या राजकीय सल्लागाराशीही संपर्क साधला आणि त्यांना याबाबत माहिती दिली. यामध्ये अजित डोवाल यांनी समपदस्थ अधिकाऱ्यांशी संवाद साधून भारताच्या या धडक आणि निष्पन्नतेच्या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली.
क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर काही वेळातच अजित डोवाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली. तसेच अमेरिकेतील भारतीय दुतावासाने यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी भारतासोबतच पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराशीही संवाद साधला. यावेळी रुबियो यांनी दोन्ही देशांतील संवादाचे रस्ते खुले ठेवण्यास सांगितले आणि यावरुन तणाव वाढू न देण्यासही प्राधान्य देण्याचे सांगितले.





