मुंबई – समंथा रुथ प्रभू ही दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणारी आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. समंथाने तमिळ आणि तेलगूमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सध्या ती अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. पुष्पा चित्रपटात समंथाने प्रेक्षकांची मन जिंकली होती. त्यामुळे तीच्या आगामी प्रोजेक्टबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती.
येत्या १२ ऑगस्टला समंथाचा ‘यशोदा’ चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात समंथासोबत वरलक्ष्मी सरथकुमारही मुख्य भूमिकेत आहे. सायन्स फिक्शन थ्रिलर असलेल्या या चित्रपटामध्ये समंथा एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. पुष्पानंतर समंथाची फॅन फॉलोविंग चांगलीच वाढली होती. साऊथ सिनेमा व्यतिरिक्तही तिचे चाहते तयार झाले आहेत.
‘यशोदा’ गाणे ‘पुष्पा: द राइज’ सारखे असेल
अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा: द राइज’ मधील ‘ओ अंतवा’ या आयटम नंबरमध्ये समंथाने तिच्या बोल्ड लूकने आग लावून टाकली होती. त्यामुळे आता समंथा ‘यशोदा’मध्ये आणखी एका धमाकेदार परफॉर्मन्स करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाच्या गाण्यांचे मोठ्या प्रमाणावर शूटिंग करण्यासाठी निर्माते हैदराबादमध्ये भव्य सेट बांधत आहेत. लवकरच या गाण्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
उन्नी मुकुंदन असेल ‘यशोदा’चा मुख्य नायक
तरुण मल्याळम अभिनेता उन्नी मुकुंदनही बहुभाषिक ‘यशोदा’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाची निर्मिती कृष्णा प्रसादसी वलेन्का यांच्या श्रीदेवी मुव्हीज बॅनरद्वारे केली जात आहे. राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज, शत्रु, मधुरिमा, कल्पिका गणेश, दिव्या श्रीपादा आणि प्रियांका शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात दिसणार आहेत. रक्षाबंधनादरम्यान प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, मल्याळम आणि कन्नडमध्ये देखील डब केला जाणार आहे.