सा. बां. विभागाकडून विनापरवाना बांधकाम; जिल्हाधिकारी करणार का कारवाई ?

शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने कवठे येथे गायरान जमिन गट न.२६७ मध्ये नियम डावलून विनापरवाना बांधकाम केले आहे. तसेच वनविभागाची परवानगी न घेता निलगिरी, सिसम, लिंब अशी दहा झाडे पाडली आहे.याबाबत कवठे येमाई येथील एका तक्रारदाराने याबाबत तक्रार अर्ज केला होता.
परंतू एका मुजोर अधिकाऱ्याने राजकीय दबाव वापरून तो अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. हे सर्व घडत असले तरी गायरान जमिनीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकाम केल्याने कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यानी केली आहे. वनविभागानेही पंचनामा करून झाडे तोडल्याप्रकरणी वृक्षप्रेमींकडून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुजोर आधिकाऱ्यांनी गायरान जमिनित विनापरवाना बांधकाम केल्याने आता या मुजोर आधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





