Akanksha Chamola: फक्त सही बाकी! गौरव खन्नासोबतच्या घटस्फोटावर आकांक्षा चमोला यांची पहिली स्पष्ट प्रतिक्रिया
Akanksha Chamola आकांक्षा म्हणाली की, "कोणतीही मुलगी इतक्या मोठ्या मंचावर फक्त प्रसिद्धीसाठी आपण घटस्फोट घेत आहोत असे सांगणार नाही. आमच्या आयुष्यात जे घडत आहे ते खरे आहे. आमच्या घरी या, माझ्या कायदेशीर टीमशी बोला. तुम्हाला संपूर्ण सत्य समजेल."

Akanksha Chamola: आकांक्षा चमोला (Akanksha Chamola) आणि गौरव खन्ना हे टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जात होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. दोघे वेगळे राहत असल्याच्या आणि घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली होती. आता या सर्व चर्चांवर आकांक्षा चमोला यांनी स्वतः पहिल्यांदाच स्पष्टपणे भाष्य केले आहे. (Akanksha Chamola)
‘लॉक अप 2’ (Lock Up 2 )या रिअॅलिटी शोमधून बाहेर आल्यानंतर आकांक्षाने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिला गौरव खन्नासोबतच्या नात्याबाबत आणि घटस्फोटाच्या चर्चांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने कोणतीही गोष्ट टीआरपी किंवा प्रसिद्धीसाठी बोलत नसल्याचे स्पष्ट केले. (Akanksha Chamola)
आकांक्षा म्हणाली की, “कोणतीही मुलगी इतक्या मोठ्या मंचावर फक्त प्रसिद्धीसाठी आपण घटस्फोट घेत आहोत असे सांगणार नाही. आमच्या आयुष्यात जे घडत आहे ते खरे आहे. आमच्या घरी या, माझ्या कायदेशीर टीमशी बोला. तुम्हाला संपूर्ण सत्य समजेल.” (Akanksha Chamola)
तिने पुढे सांगितले की, तिचा आणि गौरवच्या घटस्फोटाचा कायदेशीर प्रक्रियेचा विषय बऱ्याच काळापासून सुरू आहे. ‘लॉक अप 2’मध्ये सहभागी होण्यापूर्वीही दोन्ही बाजूंच्या कायदेशीर टीममध्ये चर्चा सुरू होती आणि शो संपल्यानंतरही ती प्रक्रिया सुरू आहे. आता फक्त काही कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करायच्या बाकी आहेत. (Akanksha Chamola)

Gaurav Khanna, Akanksha Chamola
आकांक्षाने यावेळी एक महत्त्वाचा मुद्दाही मांडला. ती म्हणाली, “आम्ही कधीच आमच्या वैयक्तिक आयुष्याचा वापर प्रसिद्धीसाठी केला नाही. आम्ही कलाकार आहोत म्हणून आमच्या प्रत्येक गोष्टीकडे पब्लिसिटी स्टंट म्हणून पाहणे योग्य नाही.” (Akanksha Chamola)
आकांक्षा आणि गौरव यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 24 नोव्हेंबर 2016 रोजी विवाह केला होता. त्यांच्या लग्नावेळीही अनेकांनी हा निर्णय प्रसिद्धीसाठी घेतल्याचे म्हटले होते. मात्र, आकांक्षाने या आरोपांचाही स्पष्ट शब्दांत इन्कार केला. “लग्न करतानाही लोकांनी आम्ही प्रसिद्धीसाठी लग्न करत आहोत असे म्हटले होते. पण तसे कधीच नव्हते,” असे ती म्हणाली. (Akanksha Chamola)
काही दिवसांपूर्वी ‘लॉक अप 2’मध्ये आकांक्षाने ती आणि गौरव वेगळे राहत असल्याचा आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याचा खुलासा केला होता. हा खुलासा ऐकून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चा आणि तर्क-वितर्क सुरू झाले. (Akanksha Chamola)
आता माध्यमांशी बोलताना आकांक्षाने या सर्व अफवांवर पूर्णविराम देत, घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याची पुन्हा एकदा पुष्टी केली आहे. मात्र, तिने कोणावरही आरोप न करता अत्यंत संयमाने आपली भूमिका मांडली. वैयक्तिक आयुष्याचा आदर राखला जावा आणि त्याचा वापर टीआरपीसाठी केला जात असल्याचे आरोप करू नयेत, असेही तिने स्पष्ट केले.
दरम्यान, गौरव खन्नाने अद्याप या विषयावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे पुढील काळात या प्रकरणात आणखी काही माहिती समोर येते का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





