जिल्ह्यात खरिपाच्या केवळ एक टक्का पेरण्या
Updated On:

अहमदनगर – यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाच्या पेरण्यांना विलंब झाला आहे. जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र सरासरी 4 लाख 47 हजार हेक्टर आहे. त्यापैकी अवघ्या 4 हजार 279 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली.
जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या अवघ्या 1 टक्का पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात 4 हजार 279 हेक्टरवरच पेरणी झाली. त्यात सर्वाधिक 4 हजार 6 हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. उर्वरित क्षेत्रावर तूर, मका व सोयाबीनची पेरणी झाली.
पेरणीयोग्य पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले. खरीप हंगामासाठी 3 लाख 7 हजार 382 टन रासायनिक खतांची मागणी केली आहे. 2 लाख 16 हजार 508 टन खतांचे आवंटन झाले. आजअखेर 98 हजार 729 टन खतांचा साठा उपलब्ध आहे.


