Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांच्या सुरक्षेबाबत शुक्रवारी दिल्लीमध्ये रिव्ह्यू मीटिंग पार पडणार आहे. त्यापूर्वी शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. अद्याप शरद पवारांनी केंद्राने दिलेली सुरक्षा घेतलेली नाही. निवडणुकीसाठीच्या घडामोडींवर पाळत ठेवण्यासाठीच ही झेड प्लस सुरक्षा देण्यात येत असल्याची शंका पवारांनी यापूर्वी व्यक्त केली होती.
शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता उद्या होणारी बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. गृह खात्याकडून अमित शाह, मोहन भागवत आणि शरद पवार यांना विशेष सुरक्षा देण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान दिल्लीत होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. Sharad Pawar |
शरद पवारांंनी व्यक्त केली शंका
केंद्रीय एजन्सींनी संभाव्य धोक्यांचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना उच्चस्तरीय सशस्त्र व्हीआयपी सुरक्षा देण्याची शिफारस केली. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. दरम्यान, शरद पवारांनी मात्र त्यांना देऊ केलेल्या Z+ सुरक्षेवरुन संशय व्यक्त केला आहे. मला दिलेली सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत. Sharad Pawar |
केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, पवारांच्या सुरक्षेसाठी 55 सशस्त्र CRPF जवानांची तुकडी तैनात असेल. शरद पवार यांनी केंद्रावर या निर्णयानंतर हेरगिरीचा आरोप केला आहे. तर आज ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. उद्याच्या आढावा बैठकीनंतर पवार झेड प्लस सुरक्षा स्वीकारणार का? हे पहावे लागणार आहे. Sharad Pawar |
हेही वाचा: