राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे ऑनलाइन वितरण
Updated On:

नवी दिल्ली – हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजे 29 ऑगस्ट या दिवशी देशात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. तसेच याच दिवशी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचेही वितरण केले जाते. यंदा मात्र, करोनाच्या धोक्यामुळे या पुरस्कारांचे एका ऑनलाइन सोहळ्याद्वारे वितरण केले जाणार आहे, असे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सांगितले आहे.
हे पुरस्कार ज्या खेळाडूंना जाहीर झाले आहेत त्यांनी आयोजकांनी ठरवून दिलेल्या वेळेत झूम व्हिडीओ कॉलच्या माध्यामातून ऑनलाइन येत हे पुरस्कार स्वीकारावे, असे आवाहनही मंत्रालयाने केले आहे.





