सातारा सैनिक शाळेतील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध

५ जानेवारी २०२० रोजी प्रवेश परीक्षा

मुंबई: सैनिक शाळा सातारा येथील सन 2020-21 च्या सत्रातील 6 वी आणि 9 वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रवेशासाठी ठराविक नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी 23 सप्टेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. या प्रवेशासाठी 5 जानेवारी 2020 रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. सैनिक शाळा सातारा संरक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त अधिपत्याखाली 1961 साली स्थापन झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑनलाईन अर्ज भण्यासाठी www.sainiksatara.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक त्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट आपल्यासोबत ठेवावा. ऑनलाईनवर पूर्णपणे भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रिन्टेड प्रत व डिमांड ड्राफ्ट आणि सोबतची जोडपत्रे सैनिक शाळा साताराच्या कार्यालयात

पोहोचवण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2019 रोजी संध्याकाळी 5वाजेपर्यंत असेल.सामान्य वर्ग (जनरल), संरक्षण दलातील आजी/माजी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी 400 रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या वर्गातील मुलांसाठी 250 रुपये ऑनलाईन नोंदणी शुल्क आहे.

इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी उमेदवार 1 एप्रिल 2008 ते 31 जुलै2010 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा. इयत्ता नववीतील प्रवेशासाठी उमेदवार 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2007 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा व सध्या मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत

असावा. इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी प्रश्नपत्रिका फक्त इंग्रजीमधून असतील. इयत्ता सहावीसाठी 60 जागांसाठी प्रवेश दिला जाईल,  तर नववीतील प्रवेशासाठी 7 जागा उपलब्ध असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)