कांदा व्यापार्यावर हल्ला करून ५० लाखांना लुटले

नगर नगर येथील नेप्ती कांदा मार्केटमधील आडत व्यापारी बंधूंवर बायपास रोडवर अद्न्यात हल्लेखोरांनी तलवार, कोयत्याने वार करून जीवेघेणा हल्ला केला. तसेच त्यांच्या जवळील सुमारे ५० लाखांची रोकड पळवून नेल्याची घटना शनिवारी (दि. ।) रोजी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
नेप्ती कांदा मार्केटमधील समीर ट्रेडींग कंपनीचे समीर सय्यद व साहेब सय्यद यांच्यावर हा हल्ला झाला आहे. त्यात ते गंभिर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. व्यापारी सय्यद हे सकाळी ११ वाजेच्या सुमारास कारमधून नगरकडून नेप्ती कांदा मार्केटकडे जात होते. केडगाव बायपास चौकातून नेप्ती कांदा मार्केटकडे जात असतांना एका वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. त्यांची कार थांबताच अन्य वाहनातून आलेल्या अद्न्यात हल्लेखोरांनी त्यांच्या कारच्या काचा फोडत दोघा बंधूवर कोयत्याने हल्ला केला. तसेच कार मधील असलेली पैशाची बॅग घेऊन पोबारा केला असल्याची माहीती समोर येत आहे.
या घटनेची माहिती समजताच पोलीस अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, शहर उपविभागीय अधिकारी अमोर भारती, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी दखाल झाले. याबाबत रात्री उशिरा पर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.





