थेऊर – येथील रस्त्यावर टँकरने भरधाव वेगात तिन आसनी रिक्षास समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला मृत्यूमुखी पडली असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर टॅकर चालक घटना स्थळाहून पळून गेला आहे.
या अपघातात अनिता सुनिल लोंढे (वय २२, रा. मुंबई, सध्या थेऊर, ता. हवेली) या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अस्लम, व रिक्षाचालक (दोघांचे नांव, पत्ता माहिती नाही) हे गंभीर जखमी झाले आहेत. मयत अनिता यांचा भाऊ मंदार राजु सकट वय २० रा. थेऊर , इंदीरा कॉलणी, ता हवेली) याने दिलेल्या फिर्यादी वरून फरार टॅकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अनिता हिस मुबंई येथे दिले असुन तिस नवरा नांदवत नसल्याने गेले ३ वर्षापासुन ती माहेरी राहण्यास आहे तिला ३ वर्षाचा मुलगा आहे.
शुक्रवार (२९ जानेवारी) रोजी सकट व शेजा-याचा किरकोळ वाद झाल्याने ते तक्रार देण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आई , चुलती, दोन बहीणी व भाचा यांचेसमवेत दोन रिक्षातून आले होते. पोलीस ठाण्यातील काम झाल्यानंतर थेऊर येथे घरी परत जाण्या करता निघाले त्यावेळी अस्लम याची रिक्षा क्रमांक एमएच १२ ईक्यु ०४५३ मध्ये अनिता व रिक्षा ड्रायव्हर असे तिघेेेजण होते. ते १२ – ३० वाजण्याच्या सुमारांस थेऊर गावचे हद्दीतील वाँशिग सेंटर समोर आले.
त्यावेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या एमएच १२ एचडी २१२० नंबरच्या इंधन टँकरने रिक्षास धडक दिली. यामुळे रिक्षा रस्त्याचे बाजुस पलटी होवुन पडली. अस्लम व रिक्षा चालक यांना मार लागल्याने ते बेशुद्ध अवस्थेत पडले. तर आनिता लोंढे हिची काही एक हालचाल होत नव्हती. ती जागीच मयत झाली होती. त्यानंतर मंदार सकट यांनी तेथे जमलेल्या लोंकाचे मदतीने दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पुणे येथील ससून रूग्णालयात पाठवुन दिले.