मतदानाच्या आवाहनासाठी एक लाख विद्यार्थ्यांची पालकांना पत्रे
Updated On:

गुवाहटी – आगामी निवडणुकांमध्ये मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी आसाममधील एक लाख विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्रे पाठवली आहेत. आसाममधील कामरुप जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ही पत्रे पाठवली आहेत.
पत्रे पाठवणारे हे विद्यार्थी कामरुप जिल्ह्यातील ५२६ शैक्षणिक संस्थांमधील इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी आहेत. आपल्या उज्वल भविष्यासाठी पालकांनी आवर्जुन मतदान करावे, असे आवाहन या मुलांनी पत्राद्वारे आपल्या पालकांना केले आहे.
आसाममधील कामरुप जिल्ह्यात निवडणुकीच्या तिसर् या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी मतदानाची टक्केवारी १०० टक्के व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
लहान मुलांनीच आपल्या पालकांना मतदानाचे आवाहन केल्याचा मानसिक परिणाम होईल आणि मतदान १०० टक्के होईल, असा विश्वास कामरुप जिल्हा अधिकारी कीर्ती जल्ली यांनी व्यक्त केला.





