पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात एक लाख शिवभक्त करणार महारुद्राभिषेक

Updated On:
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात एक लाख शिवभक्त करणार महारुद्राभिषेक

पुणे – स्वामी विचकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथील जागतिक परिषदेत शांतता व मानवतेचा संदेश दिला. स्वामी विवेकानंदांना अभिवादन व विश्वशांतीचा प्रसार आणि दहशतवाद मुक्तीसाठी 11 सप्टेंबर 2022 रोजी एक लाख शिवभक्तांकडून महारुद्राभिषेक करण्यात येणार आहे. हा महारुद्राभिषेक पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात होणार आहे, अशी माहिती संयोजक व वयम संस्थेचे संस्थापक गौरव त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र मठ मंदिर संपर्क प्रमुख मनोहर ओक, बालन ग्रुपच व्यवस्थापकीय संचालक पुनीत बालन, ओंकारेश्वर देवस्थानचे मुख्य विश्वस्त धनोत्तम लोणकर, भारतमाता महिला मंडळ ट्रस्टच्या कार्याध्यक्ष प्रियंका शेंडगे-शिंदे आदी उपस्थित होते.

गौरव त्रिपाठी म्हणाले, “स्वामी विवेकानंदांनी 11 सप्टेंबरला विश्वाला संबोधित करताना असहिष्णुता, शोषण संपवून विश्वशांती दहशतवादमुक्त समाज, धार्मिक आदर भावना आणि मानवतेचा संदेश दिला. खुल्या अर्थाने 11 सप्टेंबर हा दिवस ‘विश्वशांती दिवस’ म्हणून साजरा व्हावा. त्या निमित्ताने विश्वशांतीचा संदेश जगभर पोहोचावा, या उद्देशाने देशभर एक लाख भक्तांकडून महारुद्राभिषेक केला जाणार आहे. प्रत्यक्ष व्हर्च्यूअली होणारा हा महारुद्राभिषेक विश्वस्तरावर विक्रमी असा असेल.”

“भगवान शंकराच्या आशीर्वादाने वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात मुख्य रुद्राभिषेक, तर त्याचवेळी जगभरातील शिवमंदिरात हा विक्रमी रुद्राभिषेक होणार आहे. महाराष्ट्रात बारा ज्योतिर्लिंगासहित शिवमंदिरात रुद्राभिषेकाचा नाद घुमणार आहे. लाखो लोकांपर्यंत ‘भारत शांतता एकात्मता आणि विकासावर भर देत आहे, असा संदेश विश्वाला देण्याचा या उपक्रमातून प्रयत्न होत आहे. (One lakh Shiva devotees will perform Maha Rudrabhishek at Omkareshwar temple in Pune)

आणखी संबंधित बातम्या

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

2026-10-08 22:25:36

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट