Bomb Blast in Cricket ground : धक्कादायक! पाकिस्तानात क्रिकेट मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू , अनेक जखमी, VIDEO व्हायरल

Bomb blast in Pakistan Cricket ground : पाकिस्तानमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यातील खार तहसील येथील कौसर क्रिकेट मैदानावर क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट झाला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. यात काही मुलांचाही समावेश आहे.
पाकिस्तानी माध्यम संस्था ‘डॉन’च्या मते, हा स्फोट नियोजित होता. स्फोटानंतर मैदानावर धूर पसरला आणि प्रेक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला, खेळाडू इकडे-तिकडे पळताना दिसले.पोलिस अधिकारी वकास रफीक यांनी ‘डॉन’शी बोलताना सांगितले की, हा हल्ला सुनियोजित पद्धतीने आणि स्फोटक वापरून करण्यात आला.
This is the menace of Khawarij!At Kausar Ground,Khar,Bajaur,a bomb blast was carried out during a cricket match,targeting innocent civilians.These beasts, who play with the blood of innocents, are the greatest enemies of Islam and humanity.#NoToTerrorism #Bajaur #Pakistan pic.twitter.com/CNnawiXMvt
— Eagle Claw (@EagleClawStrike) September 6, 2025
जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी, एका आठवड्यापूर्वी खैबर पख्तूनख्वा येथील एका पोलिस ठाण्यावर क्वाडकॉप्टरच्या साहाय्याने हल्ला झाला होता, ज्यामध्ये एक पोलिस हवालदार आणि एक सामान्य नागरिकाल जखमी झाली होते.
हेही वाचा – SL vs ZIM : आशिया कपपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का! झिम्बाब्वेने अवघ्या ८० धावांत गुंडाळत उडवला धुव्वा
पोलिसांनी सांगितले की, कथित दहशतवाद्यांनी यापूर्वीही पोलिस ठाण्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते यशस्वी झाले नव्हते. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने पोलिस ठाण्यावरील किंवा कौसर क्रिकेट मैदानावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. स्फोटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.





