पीएमपीएमएल बसच्या धडकेत एका जणाचा मृत्यू
Updated On:

पिंपरी : पीएमपीएमएल बसच्या धडकेत एका जणाचा मृत्यू झाला आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावर पाषाण तलावासमोर बावधन येथे अपघात झाला.
मृदुल तरुण सिंघल (वय २५, रा. उत्तरप्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील तरुण विद्याभूषण सिंघल (वय ६२) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, पीएमपीएमएल बस चालक उल्हास रामचंद्र सरफाले (वय ४६, रा. सोंडे हिरोंजी, ता. वेल्हे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





