वाघोलीच्या संभाजीनगर परिसरात एकास करोना
Updated On:

वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली येथील बाईफ रोडच्या संभाजीनगर परिसरामध्ये वास्तव्यास असणाऱ्या 37 वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती पुणे शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक असून त्याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
त्याच्या घराच्या परिसरामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली असून पोलीस व आरोग्य विभागाने भेटी दिल्या आहेत. स्थानिक तरुणांच्या मदतीने परिसर सील करण्यात आला आहे. करोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात येणार आहे. वाघोलीमध्ये आत्तापर्यंत करोनाचे 12 रुग्ण सापडले असून यापैकी 7 जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत 5 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.





