PUNE: प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात एकदिवस बदल

पुणे – श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दि. २२ जानेवारी रोजी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर केल्याने पुणे आरटीओ कार्यालयाकडून दिवे ट्रॅक, आळंदी रस्ता कार्यालय, आयडीटीआर (नाशिक फाटा) व संगम ब्रिज मुख्यालय कामकाजात बदल करण्यात आले आहेत.
दिवे येथील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, आळंदी रस्ता येथील अनुज्ञप्ती चाचणी व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, आयडीटीआर येथील अनुज्ञप्ती चाचणी व संगम ब्रिज मुख्यालय येथील शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीसाठी ज्या नागरिकांनी, वाहनधारकांनी २२ जानेवारी रोजीच्या ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतल्या आहेत त्यांची २३ ते २५ जानेवारी दरम्यान सुधारीत अपॉइंटमेंट दिली जाणार आहे.
तसेच भोर शिबिर कार्यालय 22 ऐवजी 30 जानेवारीला होईल. वाहन तपासणी, अनुज्ञप्ती चाचणी व वाहनाची योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण विषयक कामकाजात झालेल्या बदलाची वाहनधारकांनी, उमेदवारांनी नोंद घेवून बदल केलेल्या तारखेला नियोजित ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहनही उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.





