पिंपरी: इलेक्ट्रिक वाहन खरेदीत घट

पिंपरी – पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात २०२४ या वर्षात १६,४८८ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली असून २०२३ या वर्षी १७,३८९ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली होती. त्यामुळे २०२४ मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत घट झाल्याचे दिसून येत आहे. तर फक्त सीएनजी असलेल्या ९,०६५ वाहनांची नोंदणी २०२४ मध्ये झालेली आहे.
दरवर्षी वाहनांच्या नोंदणीत वाढ होत असून पेट्रोल, डिझेल या इंधनावर चालणाऱ्या वाहनांनाही मागणी वाढत आहे. २०२१ या साली ७४,३२३ पेट्रोलवरील वाहनांची नोंदणी झाली होती. तर २०२४ मध्ये पेट्रोलवरील १ लाख १५ हजार ५९५ वाहनांची नोंदणी झालेली आहे. तर डिझेलवर चालणाऱ्या १२,७६२ वाहनांची नोंदणी २०२१ साली झाली होती, तर २०२४ मध्ये डिझेलवरील २२,१३७ वाहनांची नोंदणी झालेली आहे.
तसेच सीएनजी व पेट्रोल इंधन असलेल्या १०,८७३ वाहनांची नोंदणी २०२१ मध्ये झाली होती. तर याच इंधनावरील वाहनांच्या खरेदीत २०२४ मध्ये दुपटीने वाढ झाली असून त्याची नोंदणी २२,६५९ झाली आहे.
वर्षानिहाय आकडेवारी
इंधन – 2024 – 2023 – 2022 – 2021
पेट्रोल – 1,15,595 – 1,07,543 – 93,040 – 74,323
पेट्रोल/सीएनजी – 22,659 – 19,666 – 15,595 – 10,873
पेट्रोल/हायब्रिड – 1,787 – 2,685 – 908 – 908
डिझेल वाहने – 22,137 – 20,528 – 17,316 – 12,762
फक्त सीएनजी वाहने – 9,065 – 7,613 – 6,471 – 4,530
इलेक्ट्रिक – १६,४८८ – 17,389 – 15,879 – 4,390
पेट्रोल/इथेनॉल – 3,216 – 2,088
डिसेल/हायब्रिड – 104 – 40 – 14
एलएनजी – 130 – 129 – 15
स्टॉंग हायब्रिड इलेक्ट्रिक – 682





