शहीद जवानाच्या कुटुंबाला पंजाब सरकारचे एक कोटी रूपये

चंदीगड – पंजाब सरकारने रविवारी अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष ताबा रेषेवर शहीद झालेल्या पंजाबातील जवानाच्या कुटुंबाला एक कोटी रूपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. सुभेदार हरदीपसिंग असे या शहीद जवानाचे नाव आहे. गेल्या शुक्रवारी त्यांनी अरूणाचलच्या सीमेवर हे सर्वोच्च बलिदान दिले.
शहीद जवानाच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त करताना, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सुभेदार हरदीप सिंग यांनी देशाच्या एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च समर्पण दिले आहे.
त्यांचे बलिदान त्यांच्या सहकारी सैनिकांना त्यांचे कर्तव्य अधिक निष्ठेने आणि वचनबद्धतेने पार पाडण्यासाठी प्रेरित करेल.सुभेदार सिंग हे होशियारपूर जिल्ह्यातील बरांडा गावचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा असा परिवार आहे.





