बंगळुरु महामार्गावर दीड लाख वाहने अडकली
Updated On:

पुणे – मुंबई-बंगळुरु महामार्गावर मागील 3 दिवसांपासून सुमारे एक ते दीड लाख वाहने अडकून आहेत. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने येणार आहे. त्यामुळे टप्याटप्प्याने वाहने सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मुंबई-बंगळुरु महामार्गावरून कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू येथून मुंबईकडे निघालेली सुमारे 70 हजार वाहने कोल्हापूरजवळ अडकून पडली आहेत. तर मुंबई येथील जेएनपीटी आणि माजगाव डॉक येथून राज्यात जाणारी वाहने बंदरातच अडकून पडली आहेत. अशी सुमारे एक ते दीड लाख वाहने जागेवर थांबून राहिली आहेत.





