Prakash Surve : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा माहोल आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. पक्षातील बड्या नेत्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या आहेत. तर दुसरीकडे बिहार राज्यात पुढील काही दिवसांत विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये एनडीए विरुद्ध महागठबंधन असा राजकीय सामना सुरू आहे. यामुळे सभा, रॅलींमध्ये मोठ्या नेत्यांकडून जोरदार भाषणबाजी केली जात आहे. महाराष्ट्रात मुंबईतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा होत असून, त्यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सुर्वेंनी मराठीसंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. “मराठी माझी मातृभूमी आणि आई आहे. आणि उत्तर भारत माझी मावशी आहे. एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी मरता कामा नये. कारण मावशी जास्त प्रेम करते. आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही मला दिलं आहे. हेच प्रेम माझ्या सहकाऱ्यांवरही कायम ठेवा”, असे वादग्रस्त विधान प्रकाश सुर्वे यांनी केले आहे. हेही वाचा : ट्रम्प सरकारच्या विरोधात न्यायालयात भारतीय वंशाचे वकील ; देशाच्या भविष्याशी निगडित प्रकरणावर होणार सुनावणी या वादग्रस्त विधानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण या निमित्ताने झाली आहे. मनसे अधिकृत या एक्स पेजवरून राज ठाकरे यांचा जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. माय मराठी मेली तरी चालेल पण उत्तर भारतीय मावशी जगली पाहिजे कारण ती खरं प्रेम करते, असं म्हणणाऱ्या शिंदे गटाचे आमदार यांच्या दहिसर विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना राजसाहेब म्हणाले होते मतदारसंघात एकवेळ थोडा अंधार पडला तरी चालेल पण ‘प्रकाश’ पडलाच पाहिजे… राजसाहेब हे का म्हणाले हे दहिसरवासियांना आता कळलंच असेल… हो प्रकाश पडलाच पाहिजे ! अशी आठवण करून देत पोस्ट अन् व्हिडीओ शेअर केला आहे. माय मराठी मेली तरी चालेल पण उत्तर भारतीय मावशी जगली पाहिजे कारण ती खरं प्रेम करते, असं म्हणणाऱ्या शिंदे गटाचे आमदार यांच्या दहिसर विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना राजसाहेब म्हणाले होते मतदारसंघात एकवेळ थोडा अंधार पडला तरी चालेल पण ‘प्रकाश’ पडलाच पाहिजे… राजसाहेब हे का म्हणाले… pic.twitter.com/Fddkan36KX — MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 3, 2025 शिंदेंच्या सेनेसाठी नवा वाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर शिंदेंच्या आमदाराने भरसभेत अशा प्रकारचे वादग्रस्त विधान केल्याने यामुळे शिंदेसेनेची अडचणी होण्याची शक्यता आहे. राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून वाद झाला असतानाच आता सुर्वे यांच्या विधानाने खळबळ उडवून दिली आहे. यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत मराठीचा मुद्दा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हेही वाचा : satara news: पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक रस्त्याला सर्व सुविधा देणार ना. शिवेंद्रसिंहराजे; रस्त्याच्या 52 कोटीच्या काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ