मुंबईतल्या फेरीवाल्यांचे परत एकदा सर्वेक्षण
Updated On:

मुंबई – मुंबईतल्या फेरीवाल्यांचे परत एकदा सर्वेक्षण करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी 2014 मध्ये असे सर्वेक्षण झाले होते.
आता सर्वेक्षणा संदर्भातील समित्यांमध्ये नगरसेवक, पदाधिकारी यांनाही स्थान देण्यात येईल.
याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मंत्री सुभाष देसाई, अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार यांच्यासह मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





