पुणे जिल्हा | श्रींच्या उत्सवानिमित्त चिंबळीत धार्मिक कार्यक्रमासोबत रंगणार स्पर्धा

चिंबळी (वार्ताहर)- चिंबळी (ता. खेड) येथील शिव प्रतिष्ठान (संलग्न) नवमहाराष्ट्र मित्र मंडळ गेल्या 35 वर्षांपासूनची पंरपंरा जतन करत 36 व्या वर्षात पदार्पण केले आहे. ही गणेश मूर्तीची प्रतिष्ठा मोठ्या उत्साही वातावरण करण्यात आली आहे.
यावर्षी उजैन येथील महाकालिन शिवलिंग हा देखावा सादर करण्यात आला आहे. रोज रात्री 8 आरती तसेच रविवार (दि. 15) पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आणि आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सोमवारी (दि. 9) लहान मुलांची व मुलींसाठी मर्दानी खेळाच्या स्पर्धा, मंगळवारी (दि. 10) सचिन ढोबळे यांचे व्याख्यान, बुधवारी (दि. 11) जादुचे प्रयोग , गुरुवारी (दि. 12) मुला / मुलींची डान्स स्पर्धा, शुक्रवारी (दि. 13) महापूजा व रात्री आठ ते दहा मनमोहन महाराज गिरी यांचे कीर्तन व महाप्रसाद,
शनिवारी (दि. 14) खेळ रंगला पैठणीचा, रविवारी (दि. 15) विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून यामध्ये ढोल-ताशा पथक हा जिवंत देखावा सादर करून गणेश विसर्जन नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.




