उमेदवारांनी साधला गुरुपुष्यामृत योग; आज कोणी उमेदवारी अर्ज दाखल केले, पहा यादी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 ऑक्टोबरपर्यंत 153 उमेदवारांचे 164 नामनिर्देशन पत्र भरण्यात आले होते. आज गुरुवारी गुरुपुष्यामृत योग साधून शक्तीप्रदर्शन करत अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमितभाई शाह, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डाजी, तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार कोथरूडकरांच्या आशीर्वादाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत… pic.twitter.com/ZExwuXIHBV
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 24, 2024
उमेदवारी अर्ज कोणी-कोणी भरले?
चंद्रकांत पाटील (महायुती), छगन भुजबळ (महायुती) , अद्वय हीरे (महाविकास आघाडी), रोहित पाटील (महाविकास आघाडी), हर्षवर्धन पाटील (महाविकास आघाडी), संतोष बांगर (महायुती), भागिरथ भालके (अपक्ष), रणजीत शिंदे (अपक्ष), अर्जुन खोतकर (महायुती), अविनाश जाधव (मनसे), धनंजय मुंडे (महायुती), राजन विचारे (महाविकास आघाडी), जितेंद्र आव्हाड (महाविकास आघाडी), राजू पाटील (मनसे), सुलभा गायकवाड (महायुती), वसंत गीते (महाविकास आघाडी), आदित्य ठाकरे (महाविकास आघाडी), वैभव नाईक (महाविकास आघाडी),
जयंत पाटील (महाविकास आघाडी), किरण सामंत (महायुती), अतुल भातखळकर (महायुती), मंगलप्रभात लोढा (महायुती), अमित साटम (महायुती), मिहिर कोटेचा (महायुती), कालिदास कोळंबकर (महायुती), पराग अळवणी (महायुती), विक्रम सावंत (महायुती), सुधीर गाडगीळ (महायुती)
आज आ.पंकजाताई, डॉ.प्रीतमताई यांच्यासह लाडक्या बहिणींच्या सोबतीने परळी विधानसभा निवडणुकीसाठी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला.
सकाळी आमच्या बाईंनी औक्षण करून आशीर्वाद दिले. नाथ्रा गावातील ग्रामदैवताचे दर्शन घेऊन, गोपीनाथगडावर स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मृतींना तसेच… pic.twitter.com/3iBwnywzX1
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 24, 2024
सुरेश खाडे (महायुती), सुहास बाबर (महायुती), भास्कर जाधव (महाविकास आघाडी), योगेश कदम (महायुती), यशोमती ठाकूर (महाविकास आघाडी), बंटी भांगडिया (महायुती), विनोद अग्रवाल (महायुती),संजय राठोड (महायुती), समरजीत घाटगे (महायुती), दिलिप वळसे पाटील (महायुती), राधाकृष्ण विखे पाटील (महायुती), हीरामण खोसकर (महायुती), माणिकराव कोकाटे (महायुती), नरहरी झिरवळ (महायुती), राणी लंके (महाविकास आघाडी), प्रशांत बंब (महायुती), राजेश टोपे (महाविकास आघाडी), सुभाष देशमुख (महायुती), अमल महाडिक (महायुती), राजेंद्र पाटील यड्रावकर (महायुती), संग्राम थोपटे (महायुती), अनिल पाटील (महायुती) यांसह अनेक उमेदवारांनी आज अर्ज भरले आहेत.
२९ ऑक्टबरला नामांकन पत्र भरण्याची शेवटची तारीख –
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून २९ ऑक्टबरला नामांकन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जाची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.





