दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘सान्या मल्होत्रा’ने मुंबईत घेतले 14 कोटींचे घर

मुंबई – सान्या मल्होत्राने जुहूतील आलिशान अपार्टमेंटमध्ये एक घर विकत घेतले आहे. सान्या मल्होत्रा आणि तिचे वडील सुनील कुमार मल्होत्रा यांनी 14.3 कोटी रुपयांना हे घर विकत घेतले
आहे. हा फ्लॅट ज्या अपार्टमेंटमध्ये आहे, त्याच अपार्टमेंटमध्ये हृतिक रोशनने तब्बल 100 कोटी रुपयांना एक आलिशान फ्लॅट विकत घेतलेला आहे.
View this post on Instagram
2018 मध्ये सान्याने मॅक्सिमम सिटीमध्ये एक फ्लॅट विकत घेतलेला होता. सान्या मूळची दिल्लीची आहे. तिने एक फ्लॅट आगोदरच विकत घेतलेला असल्यानंतर आणखी एक फ्लॅट तिला का घ्यावा लागला हे देखील तिने सांगितले. “मी सध्या वन बेडरूम अपार्टमेंटमध्ये राहात होते. तेव्हा मी एकटीच राहात होते.
मात्र, आता माझ्या संपूर्ण कुटुंबाला माझ्याबरोबर राहायचे असल्यामुळेच हा नवीन फ्लॅट विकत घेतला.’ असे सान्या म्हणाली. एवढा महाग फ्लॅट घेण्याबाबत ती आगोदर फारशी तयार नव्हती.
मात्र, तिच्या वडिलांनी तिला ही गुंतवणूक करणे फायद्याचेच असेल, असे समजावले. भाड्याच्या घरात राहाण्यापेक्षा स्वतःचा फ्लॅट असणे कधीही फायद्याचेच असेल, असे त्यांचे म्हणणे होते. “मीनाक्षी सुंदरेश्वर’ हा तिचा सिनेमा लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे.





